मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
यासोबतच कोरोना प्रतीबांधक लस म्हणून राज्यातील १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वांना कोरोना प्रतीबंधक लस मिळावी हा हेतू साकार होईल. सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा कमी असून बुस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते.
यासोबतच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा करण्यात आली असून (ग्रामविकास विभाग) बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार आता मिळणार आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्येही सुधारणा करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “फक्त दोघांनी शपथ घेतली, म्हणजे सरकार आलं असं नाही”; राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Clyde Crasto : “क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- Mohan Bhagwat | फक्त खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरे देखील करतात – मोहन भागवत
- Urfi Javed | उर्फी जावेदचा ड्रेस पाहून तुम्हीही व्हाल ‘घायाळ’; नेटकऱ्यांच्या मजेदार कॉमेंट्स
- Sanjay Raut : राज्यात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवाल


