Share

संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली

Published On: 

बीड : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस ते काल जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या जळगावच्या दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी ते भाजप खासदार रक्षा खडसे यांना भेटले.

दरम्यान, फडणवीसांच्या भेटीगाठींवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?’ असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

आता संजय राऊत यांच्या विधानांचा माजी मंत्री व भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. ‘मी सुद्धा संजय राऊतांचं ते वाक्य ऐकलंय, आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे. आमंत्रण स्वीकारलं आम्ही,’ असं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे दोन दशकांहून अधिक काळ मित्र राहिलेल्या भाजप-शिवसेनेची एकत्रित मैत्री अनुभवणाऱ्या ‘मातोश्री’मध्ये पुन्हा या दोन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसणार का ? यावरून उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!