मुंबई – सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील रणजितसिंह डिसले गुरुजींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवल्यानंतर आता आणखी एक मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात असणार आहे . काही दिवसांपूर्वी गुरुजींच्या नावाने स्कॉलरशीप सुरू करण्यात आली होती. तसेच, ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वरही त्यांची नेमणूक करण्यात आली. आता जागितक बँकेच्या शिक्षण सल्लागार समितीवरही त्यांना नेमण्यात आलं आहे.
डिसले गुरुजी हे ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक आहेत. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये डिसले गुरुजींना महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.
याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे.या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- घरात असलेल्या झाडाला गळफास लावून घेत ३६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- ट्वीटर युजरचा ‘बाप’ काढणं महापौरांना पडलं महागात, सोशल मीडियावर होताहेत ट्रोल

