🕒 1 min read
मुंबई : इंडियन आयडल शो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडत आहे. यातच आता या शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं अलिबागवरुन एका बॅकस्टेज आर्टिस्टला टोला लगावला. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी त्याला चांगलेच सुनावले आहे. अलिबागबद्दल काहीही म्हणशील तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन असा जबरदस्त इशारा त्यांनी दिला आहे.
अमेय खोपकर यांनी या प्रकरणावर एका फेसबुक व्हिडीओद्वारे संताप व्यक्त करत ते म्हणाले, ‘मी आदित्य नारायणचा एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीवर संतापला अन् म्हणाला मी काय अलिबागवरुन आलोय का? त्याचं हे बोलणं आम्हाला खटकलं आहे. आलिबागची लोकं तुम्हाला इतकी मुर्ख वाटतात का? त्यानं आत्ताच्या आत्ता याबाबत माफी मागावी. मी त्याच्या वडिलांसोबतही बोललो आहे. जर त्यानं माफी मागितली नाही. तर त्याच्या कानाखाली आवाज काढून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं जाईल. यापुढे जर अलिबागबद्दल अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली तर तिथं तुमचं एकही चित्रीकरण करु दिलं जाणार नाही. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तुमची गाठ आहे.’ असा इशारा अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणला दिला.
https://www.facebook.com/ameya.khopkar/videos/10160944223995550
आदित्य नारायण हा प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे. तो देखील एक गायक आहे. सध्या तो इंडियन आयडलमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे. मात्र यावेळी त्याच्या वक्तव्यावर मनसे संतापली आहे. आदित्यनं यावर अद्याप या प्रकरणावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसून, या प्रकरणानंतर आता आदित्य माफी मागणार की नाही याकडे आता अनेकांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, कोरोना लसीकरण फुकट मिळवा; भाजपची अनोखी ऑफर
- राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्याचा ठाकरे सरकारचा विचार
- कोरोना विरुद्धच्या लढ्यात बीसीसीआयची ‘ही’ मोठी मदत
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

