मुंबई : कोरोना काळात केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला असून आता चोरीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. आता एका चोराने चक्क रुग्णालयातच डल्ला मारला. मात्र, या चोराला आपण काय चोरतोय हेच माहिती नव्हतं. जेव्हा त्याला कळालं हे कोरोनाच औषध (व्हॅक्सिन) आहे, तेव्हा त्याने एका पिशिवीत चिट्ठी ठेवून पोलीस स्थानकाबाहेरच्या चहावाल्याकडे दिली. ती पिशवी चहावाल्याने पोलीस स्थानकात दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
झालं असं की, बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलमधून कोरोना लसीचे शेकडो डोस चोरीला गेले होते. यानंतर, अवघ्या बारा तासात सिव्हील लाईन ठाण्याबाहेर असलेल्या चहावाल्याकडे चोराने पिशवी देत हे डोस परत केले, अशी माहिती जिंदचे पोलीस उपायुक्त जितेंद्र खटकड यांनी दिली.
ठाण्याच्या मुंशींसाठी खाद्यपदार्थ आहेत, असा निरोप देऊन चोरट्याने पोलीस स्थानकासमोरील चहावाल्याकडे ही पिशवी सुपूर्द केली व तो पसार झाला. चहाच्या दुकानातील वृद्ध पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांकडे ती पिशवी देऊन गेला. त्यामध्ये कोविशील्डच्या 182 वाइल, तर कोवॅक्सिनचे 440 डोस होते. यासोबतच, त्यात एक चिट्ठी देखील होती. त्यात, ‘सॉरी मुझे पता नहीं था कि ये कोरोना कि दवाई है !’ असा मजकूर लिहिला होता.
Humanity exist !
"Sorry, Did Not Know its a vaccine": Thief In Haryana returns #CovidVaccine stolen from a hospital, leaving this note, The few who are hoarding & black marketing the life saving drugs should learn a lesson or two. pic.twitter.com/Y0tFmuzbMV
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 23, 2021
दरम्यान, हे प्रकरण चांगलंच व्हायरल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे. ‘मानवता अस्तित्वात आहे! चोराने माफीची चिट्ठी लिहून कोविड व्हॅक्सिन परत केली. जीवनदान देणाऱ्या महत्वाच्या औषधांची साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांनी यातून धडा घ्यायला हवा,’ असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ मात्र,अर्थचक्राला झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री
- देवेंद्रजी, राज्यातील जनतेशी बांधिलकी जपा, जनतेसाठी केंद्राशी दोन हात करायला पुढे या! – नाना पटोले
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा ; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

