🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० मालिकेत विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला केवळ १४० धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकानी तब्बल इंग्लंडच्या चार खेळांडुना धावबाद केले. मात्र यातील हेदर नाईटचा बळी वादात सापडला आहे. या सामन्यात दिप्ती शर्माने तिला धावबाद केले. जेव्हा दिप्तीने हेदरला धावबाद केले तेव्हा हेदर नॉन स्ट्रायकर एन्डला परत येत होती. मात्र यादरम्यान दिप्ती चेंडु अडवण्यासाठी मध्ये आली. त्यामुळे हिदरला क्रिजमध्ये बॅट ठेवणे शक्य झाले नाही.
https://twitter.com/KartikS25864857/status/1414519898026303495
यादरम्यान दिप्तीने यष्टीचा अचुक वेध घेतला आणि भारतीय खेळाडूंनी अपील करताच पंचानी हेदरला बाद दिले. यावर इंग्लंडच्या चाहत्यांनी दिप्ती जाणुन बुजुन मध्ये आली असा आरोप केला आहे. आयसीसी नियमानुसार एखादा खेळाडू जाणुन बुजून मध्ये आला तर त्यावेळी ऑबस्ट्रक्शन ऑन फिल्ड असे मानत फलंदाजाला नाबाद ठरवण्यात येते. मात्र हा अधीकार मैदानातील पंचावर अवलंबुन असतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

