औरंगाबाद : शहरात तरूणाई आणि सायकलप्रेमींसाठी क्रांती चौक ते रेल्वेस्थानक पर्यंत सहा किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. सायकल ट्रॅकच्या कामावर जवळपास तीन कोटींचा खर्च करण्यात झाला आहे. या ट्रॅकचे उद्घाटनही जानेवारी महिन्यात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. मात्र सहाच महिन्यात सायकल ट्रॅकचे महत्व आणि वापरकर्त्यांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आलेले हातगाडी चालकांचे अतिक्रमण, दुचाकीधारकांचा शिरकाव आणि तुरळक सायकलस्वार तेही अनेकदा ट्रॅकमधून न जाता बाजूच्या रस्त्याचा वापर करणारे यामुळे स्मार्ट सिटीचा सायकल ट्रॅक आपला ट्रॅक सोडून भलतीकडेच वळल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्ते खराब असताना आधी रस्त्यांची कामे करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बांधा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये औरंगाबाद शहराने भाग घेतला होता. या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील सायकल चालकांसाठी ट्रॅक बनवला गेला. मात्र काही दिवसातच सायकल ट्रॅकवर दुचाकी, चारचाकी वाहने, फळांचे स्टॉल्स व इतर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले. अतिक्रमण धारकांना मनपाने दंड लावण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र या निर्णयाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अजूनही सायकल ट्रॅकवर विविध प्रकारच्या फळ गाड्या, फेरीवाले, दुचाकी-चारचाकी यांची गर्दी दिसून येते. त्यामुळे हा सायकल ट्रॅक शहरात केवळ नावालाच उरला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.
फसलेल्या या सायकल ट्रॅक मधून धडा न घेता मनपा प्रशासनाने आता शहरातील आणखी दोन रस्त्यांवर सायकल ट्रक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यात टीव्ही सेंटर ते सलीम अली सरोवर, सेंट्रल नाका ते एमजीएम या रस्त्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत टिव्ही सेंटर ते सलीम अली सरोवर स्त्यावर बर्याच मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. त्यामुळे त्या खड्ड्यांच्या शेजारी सायकल ट्रॅक बनवणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सायकल ट्रॅकला शहरवासीयांचा विरोध नाही. मात्र अजूनही शहरातील संपूर्ण रस्ते चकचकीत झालेले नाही. त्यामुळे आधी रस्त्यांची कामे करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बांधा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना किंचित दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
- ‘कृषी विधेयकांची संशयास्पद घाई थांबवा, अन्यथा मुंबईच्या सीमा रोखत आरपार आंदोलन सुरू होईल’
- ‘मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करणार नाही’ ; भाजपची स्पष्ट भूमिका
- औरंगाबादेत लसींचा तुटवडा कायम, पालिका तिसरी लाट रोखणार कशी?\
- पंकजा मुंडे उद्या मोठा निर्णय घेणार ? मुंबईत राजीनामा सत्र सुरु…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

