🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडमधील सेलिब्रिटीदेखील आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहेत. अभिनेत्री करीना कपूरही कुटुंबासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन करत आहे. तिने दिवाळीच्या निमित्ताने एक खास फोटो शेअर केलाय. करीनाने शेअर केलेल्या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोवर भरपूर लाईक्स आणि कमेंटस् येत आहेत.
दरम्यान करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ अली खान आणि जेहचा एक क्यूट फोटो शेअर केलाय. या फोटोत सैफ लहान मुलगा जेह म्हणजेच जहांगीरसोबत खेळताना दिसतोय. फोटो शेअर करत ती कॅप्शनमध्ये म्हणाली,’प्रेम आणि प्रकाश’ तसंच तिने पुढे एक हार्टचं इमोजी दिलंय. सैफ आणि जेहचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करीनाने शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. या फोटोला अवघ्या काही तासात दोन मिलियनहून अधिक लाइकस् मिळाले आहेत. तसचं नेटकऱ्यांनी कमेंट करत करीनाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी निमित्ताने अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CV153IJoE8-/?utm_source=ig_web_copy_link
करीनाने आजवर अनेक चित्रपटाच्या माध्यमाने प्रेक्षकांचे मनोरंज केले आहे. तसेच सोशल मीडियावर ही सतत सक्रिय असून चाहत्यांशी संवाद साधत असते. दरम्यान स्विमिंगपुल जवळील तैमूरचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोस नेटकऱ्यांनी मोठी पसंती दर्शविली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ’40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त करणारच’
- पंतप्रधानांची दिवाळी जवानांसोबत, सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना दिला उजाळा
- पारंपरिक वेशभूषेत मानसीने केली पतीसोबत अनोखी दिवाळी साजरी
- ‘केंद्र सरकारचं मन मोठं नाही तर सडकं, कुचकं आहे’, संजय राऊतांचा घणाघात
- ‘100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन??’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
