मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला आणि या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर कारावाई केली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. यासंदर्भात नवाब मलिकांनी NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र आल्याचं म्हंटल आहे. याबाबतीत मी लवकरच खुलासा करणार असल्याचेही त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
Envelope of the letter received by me from an unnamed NCB official.
Contents of which I will be releasing soon on Twitter pic.twitter.com/uPAO2F5XKP— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
नवाब मलिक यांनी केलेल्या या दाव्याची फेटाळणी करत भाजपच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी मलिकांवर आरोप केले आहेत. मलिकांनी दाखवलं ते पत्र एनसीबी अधिकाऱ्याकडून किंवा मुंबई कडून आलेलं नसून ते पत्र बिहारमधून असल्याची शंका व्यक्त केली आहे. कम्बोज यांनी त्या पत्रावर असलेल्या स्टॅम्पचा फोटो पोस्ट करत ते बिहारमधील स्टॅम्प असल्याचं सांगितलं आहे.
मियाँ नवाब का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा !@narcoticsbureau @aajtak @TV9Marathi @ABPNews @jankibaat1 @ANI @News18India @IndiaTVHindi @News18lokmat @AmitShah @mipravindarekar @ZeeNews pic.twitter.com/9hElAaXeBD
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) October 27, 2021
दरम्यान, मलिक यांनी स्वत:च ते पत्र लिहलं आणि स्वत:लाच पाठवलं आणि एनसीबीकडून आलं असल्याचं भासवलं आहे. हे सगळं त्यांनी स्वत:ला आणि आपल्या जावयाला वाचवण्यासाठी केलं आहे, असा आरोपही यावेळी मोहित कम्बोज यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मौलाना अहमद यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती; क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

