Share

‘व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या अध्यक्षांचं तोंड कापावं लागलं त्याच्या प्रवक्त्याकडून…?’

Published On: 

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ पार्टीवर केलेल्या  छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा कारवाई दरम्यान अटकेत आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या सर्व प्रकरणाला वेगळं वळण लागलं किंवा लावलं गेलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा करुन.

हे प्रकरण आता शाहरुख खान किंवा आर्यन खान राहिलं नसून समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लिम इथपर्यंत येऊन पोहचलं आहे. वानखेडे यांच्या जातीचा दाखला, मॅरीज सर्टीफिकेट अशी सगळी कागदपत्रे मलिकांनी ट्वीट करत आणि पत्रकार परिषदा घेत जनतेसमोर मांडली आहेत. या सर्व प्रकरणावरुन आता भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है, असं म्हणत तुषार भोसलेंनी एकाच दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

https://twitter.com/AcharyaBhosale/status/1453295662947356673?s=20

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!