🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून शहिदांच्या कुटुबीयांच्या पाठिशी देश उभा असल्याचे म्हटले. तसेच, जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.
Attack on CRPF personnel in Pulwama is despicable. I strongly condemn this dastardly attack. The sacrifices of our brave security personnel shall not go in vain. The entire nation stands shoulder to shoulder with the families of the brave martyrs. May the injured recover quickly.
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2019
दरम्यान,दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू- काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या संपर्क साधून हल्ल्याच्या माहिती घेतली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

