🕒 1 min read
श्रीनगर : गुरुवारी काश्मीरमध्ये सुरक्षादलाच्या मोठं मिळालंय. दक्षिण काश्मीरच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तब्बल चार दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलाला यश आलंय. यातील एक चकमक कुलगाम भागात झाली तर दुसरी चकमक पुलवामा भागात सुरू होती. या चकमकीत सुरक्षादलानं कुलगाममध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पुलवामामध्येही चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
पुलवामात काल रात्री चकमक सुरू झाली. घटनास्थळी दोन दहशतवादी असल्याच्या संशयावरून लष्कर आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला होता. पुलवामातील पुछाल भागात दहशतवादी लपल्याचे पोलिसांना कळाले होते. यादरम्यान घरात दडून बसलेल्या लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यावेळी लष्कराने त्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. शस्त्र ठेवण्याचे दहशतवाद्यांना सांगण्यात आले.
पुलवामा के पूछल गांव में भी खबर थी कि 2 आतंकवादी हैं। वहां भी घेराव किया गया। उन्हें समर्पण करने के लिए कहा गया। उन्होंने फायरिंग की जिसका जवाब दिया गया। इस मुठभेड़ में दोनो आतंकवादी मारे गए। ये दोनो स्थानीय आतंकवादी हैं और LeT से संबंध रखते हैं: विजय कुमार https://t.co/gTVhmKva9n
— ANI_HindiNews (@AHindinews) July 8, 2021
परंतु त्यास दहशतवाद्यांनी प्रतिसाद दिला नाही. याउलट त्यांनी गोळीबार सुरू केला. यात दोन दहशतवादी ठार झाले. तत्पूर्वी कुलगाम पोलिस आणि आरआरच्या जवानांनी कुलगामच्या झोदार भागात केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. तत्पूर्वी हंडवाडा येथे सुरक्षा दलाने हिज्बुलचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईला ठार केले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोणी सांगितले मुंडे भगिनी नाराज आहेत? त्यांची उगीच बदनामी करू नका’, फडणवीस संतापले
- ‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले होते’, दरेकरांचा राऊतांना टोला
- मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी नाही, पण शरद पवारांनी फोन करून शुभेच्छा दिल्या’, मंत्री राणेंची माहिती
- ‘मंत्रिपद मिळवण्यासाठीच राणेंनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

