Share

आम्ही पाकिस्तानशी नाही तर काश्मीरमधील तरुणांशी संवाद साधू – शाह

Published On: 

🕒 1 min read

पुलवामा : गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरचा आपला 3 दिवसांचा दौरा आणखी वाढवला असून काल रात्री पुलवामा इथल्या लेथपोराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर त्यांनी मुक्काम केला. आपल्याला एक रात्र तरी जवानांसोबत घालवायची होती आणि त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या होत्या असं शिबिरातील जवानांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितलं.

370 वं कलम रद्द केल्यानंतर इथे रक्तपात होऊ न दिल्याबद्दल त्यांनी CRPF आणि अन्य सुरक्षा दलांचे आभार व्यक्त केले. 28 हजार जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेमुळेच इथे रक्तपात झाला नाही आणि काश्मीरमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू झाल्याचं शहा याने सांगितलं. दहशतवादाच्या विरोधात केंद्र सरकारचं शून्य सहनशीलतेचं धोरण असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ.फारूख अब्दुल्ला यांना पाकिस्तानशी संवाद साधण्याचा सल्ला दिला आहे पण आम्ही पाकिस्तानशी नाही तर काश्मीरमधील तरुणांशी संवाद साधू असंही अमित शहा यांनी सांगितलं.

ते म्हणाले, ‘सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी अशी सूचना फारुक अब्दुल्ला यांनी केल्याचे मी वृत्तपत्रांत वाचले. त्यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मात्र त्याऐवजी आपण काश्मिरी युवकांशी बोलायला हवे’ असे शहा यांनी सांगितले. ‘अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा एकमेव उद्देश काश्मीर, जम्मू व नवनिर्मित लडाख यांना विकासाच्या मार्गावर आणण्याचा आहे. आमच्या प्रयत्नांची फळे तुम्हाला २०२४ पर्यंत दिसून येतील’ असेही गृहमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!