औरंगाबाद : बेगमपुरा पोलीस ठाण्यातील अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्यानंतर अनेक जन कामावर हजर झाले होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ताप आल्यामुळे भास्कर शंकर मेटे (वय ५२,रा. मयूरपार्क) यांना नातेवाईकांनी जळगाव रोडवरील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी (दि.१९) रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
मेटे हे बेगमपुरा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेटे यांनी कोरोना कालावधीत मोठे काम केले. डॉक्टरांनी त्यांचा सिटीस्कॅन काढला. सिटी स्कॅनच्या अहवालानुसार डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची लक्षणे असल्यामुळे, अधिक उपचारांसाठी त्यांना एमजीएम कोविड सेंटर येथे पाठविले.
तेथे उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मेटे यांच्या पश्चात पत्नी, बीएचएमएसचे शिक्षण घेत असलेली कन्या आणि बारावीत असलेला मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार नीळ हे तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
- #Breaking : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्र्याची करोडो रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?


