🕒 1 min read
औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पाण्याचा उपसा करणार्या विद्युत मोटारीजवळील पॅनल बोर्डमध्ये एका उंदराने गुरुवारी पहाटे केबल कुरतडली. त्यानंतर शॉक लागून उंदीरही मेला. शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण केबल जळाली. महापालिकेच्या यांत्रिकी विभागाला केबल बदलणे आणि इतर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल चोवीस तास लागले. मात्र या एका उंदरामुळे महापालिका बेजार झाली होती.
गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहानिशा केली असता, एका उंदराने केबल कुरतडली होती. उंदराला नंतर शोक लागल्यामुळे पॅनल बोर्डमधील केबल शॉर्टसर्किटने जळाली. या भागातील ट्रान्सफाॅर्मर सुद्धा खराब झाला होता. उपअभियंता बी. डी. घुले यांनी पर्यायी ट्रान्सफार्मर बसवून त्याची चाचणी करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी चार वाजता पंपिंग सुरू करून पाणी उपसा सुरू झाला.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजता फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी दाखल झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन रात्री साडेनऊ वाजता शहरातील जलकुंभांत पाणी पडले. यानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत जलकुंभ भरल्यानंतर मागील बुधवारी व गुरुवारी सिडको-हडकोसह ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तेथे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शुक्रवारी दिवसभरात बहुतांश वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी हतबल! बीड जिल्ह्यात १८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका
- पुण्यातील कुख्यात गुंड ‘गजा मारणे’ फरार !
- परभणी बसस्थानक बनले समस्यांचे आगार, अवकाळी पावसाने परिसर बनला चिखलमय
- एकनाथ खडसेंना इतक्या वेळा कोरोना होतोच कसा याचं संशोधन झालं पाहिजे – महाजन
- आठवले साहेब का नारा, अमिताभ बच्चन है फिल्मी दुनिया का तारा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
