परभणी ः गंगाखेड येथील महाराष्ट्र ऑईल मीलच्या केंद्रावर शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा (Moisture)तपासणी यंत्रातच हेराफेरी केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संतप्त शेतकर्यांनी या बाबतची तक्रार केल्यानंतर महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे.
गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील शेतकरी सखाराम बोबडे यांनी आपले सोयाबीन विक्री करीता महाराष्ट्र ऑईल मीलमध्ये आणले होते. दुपारी 2 नंतर सोयाबीनचे पोते भरलेले ट्रॅक्टर प्रवेशद्वारातून आत सोडल्यानंतर माल उतरवतेवेळी सोयाबीनचा नमूना तपासणीसाठी यंत्रात टाकला. त्याच वेळी काही तांत्रिक हेराफेरी असल्याचा संशय बोबडे यांच्यासह अन्य शेतकर्यांना आला. त्यावेळी या बाबत विचारणा केली असता कर्मचार्यांनी उडवा – उडवीची उत्तरे द्यावयास सुरुवात केली. बोबडे यांनी या प्रकाराबाबत परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला. या नंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशीही संपर्क साधून यंत्रातील या हेराफेरीची बाब निदर्शनास आणून दिली.
दरम्यान नायब तहसीलदार गौरीशंकर आवळे, तलाठी चंद्रकांत साळवे, कार्यालय प्रमुख बिलपट्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनास्थळावर पंचनामा देखील केला. ओलावा मोजण्याच्या यंत्रात सोयाबीन न टाकताच 2.6 असा ओलावा दाखवणे, 12 टक्के ओलावा असलेले सोयाबीन खरेदी करावे, असा नियम असतानाही त्यास 10 टक्के ओलाव्याचा नियम लावून 12 टक्के ओलाव्याचा सोयाबीन नाकारणे किंवा त्यांचे पैसे कमी करणे अशी किलोमागे किमान चार – साडेचार किलो लूट होत असल्याची तक्रार या शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी
- “चंद्रकांत पाटील यांनी ‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण सार्थक करून दाखवली”
- मस्तावलेल्या शंकर गडाख या मंत्र्याला लाथ मारून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा – अनिल बोंडे
- अब्दुल कलाम हा वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता ; मोदींना श्रेय देऊ नये
- एकनाथ खडसेंना इतक्या वेळा कोरोना होतोच कसा याचं संशोधन झालं पाहिजे – महाजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

