Share

शाळेतून छडी होणार गायब, शिक्षक, मुख्याध्यापक संभ्रमात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचेल, अशा प्रकारची शिक्षा करता येत नाही अशी तरतूद शिक्षण बालहक्क कायद्यात आहे. त्यानुसार, शाळांमधून छडीची शिक्षा वगळण्यासाठी प्राचार्य, शिक्षक, मुख्यध्यापकांसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आली आहे. या सूचनांनुसार शाळांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्याचे बालहक्क आयोगाने शिक्षण विभागाला बजावले आहे. यानुसार यावर कार्यवाही व्हावी, असे आदेश शनिवारी शिक्षण विभागाने शाळा व शिक्षण उपसंचालकांना दिलेत.

‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम’ हे कालबाह्य झाले आहे. उलट विद्यार्थ्यांना अशी शारीरिक शिक्षा करणाऱ्या किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांना दंड करावा अशी तरतूद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बालहक्क संरक्षण आयोगानेदेखील काही सूचना तयार करून, त्या शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार,या मार्गदर्शक सूचना कार्यशाळांद्वारे सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांच्या निदर्शनास आणून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अहवालही शिक्षण संचलनालयास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिक्षक, मुख्याध्यापक संभ्रमात
बालकांना छडीने मारणे, हे चुकेचे आहेच. मात्र, सर्व शिक्षणतज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंशिस्त निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे व्रात्य व बेशिस्त मुलांना शिस्त कशी लावावी, हा प्रश्न शिक्षक व मुखाध्यापकांपुढे उभा राहिल्याची प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.

शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन पद्धतीने : पंकजा मुंडे

… तर पोलीस करणार मोबाईल जप्त

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!