🕒 1 min read
मुंबई : अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षक भरती रखडली आहे. ही भरती लवकर करावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. यासाठी अनेक आंदोलनही करण्यात आली. पण याबाबतचा कोणतीही प्रक्रिया झाली नाही. पण नुकतंच उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
राज्यातील प्राध्यापकांची व तासिका तत्वावरील पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी नेट- सेट पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर इतर उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याआधी दिलेली होती.
मात्र येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज नांदेडमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करणार असल्याचे वक्तव्य उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी केलं. मंत्र्यांच्या या घोषणेमुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- धुळ्यासाठी २१० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर-अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
