Share

एकनाथ खडसेंना ‘राष्ट्रवादी’त महत्वाचं पद आणि आमदारकी मिळणार?

Published On: 

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.

गेल्या आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त करून राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न केला गेला मात्र दुसऱ्याबाजूला एकनाथ खडसेंना डावलण्यात आल्याने त्यांनी पक्ष सोडून योग्य निर्णय घ्यावा अशा मागणीचा जोर समर्थकांनी लावला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ खडसे यांनी अचानक मुंबई दौरा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील मुंबईत असल्याने त्यांची भेट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भेट न घेताच खडसे मुक्ताईनगरला परतले. अशातच, माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. “ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला” असं विधान पाडवी यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंच्या पदावरून व आमदारकी वरून चाचपणी देखील झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे. येत्या १७ तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे आपल्या राजकीय घटांची देखील नव्याने स्थापना करू शकतात अशा वृत्तांना जोर आला आहे. गेल्या काही महिन्यात खडसे भाजपला राम-राम ठोकणार अशा चर्चा होत होत्या. मात्र खडसेंनी अनेक वेळा हुलकावणी दिली असून आता सर्वांच लक्ष येत्या १७ तारखेकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!