🕒 1 min read
मुंबई : फ्लाईंग सिख म्हणून ओळख असलेले दिग्गज धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले होते. पण मात्र अखेर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची हार झाली.
मिल्खा सिंग यांच्या निधनावर भारताचा माजी धडाकेबाज सलामीवर फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. सेहवागने या ट्विटमध्ये ते धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक होते असे म्हणाला आहे. ‘एक खुप मोठा दिग्गज आपल्याला आज सोडुन गेला. मात्र मिल्खा सिंग हे नाव धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक म्हणून सदैव स्मरणात राहील. माझी सहानुभुती मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयासोबत सदैव राहील. ओम शांती’ असे ट्विट सेहवागने केले आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/1406069292878032896
मिल्खा सिंग यांनी तब्बल चार वेळा आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. १९६० साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धेत त्यांनी ४०० मीटर शर्यत ४५.६ सेकंदात पूर्ण केली होती. यापुर्वी १९५६ मध्ये आशियाई स्पर्धेत २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. भारत सरकारने त्यांना २००७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले होते. पाच दिवसापुर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर मिल्खा सिंह यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- दु:खद! फ्लाइंग सिख धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन
- औरंगाबादची चिंता वाढली, ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा वाढ
- आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये डास, हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा!
- अन् भुशी धरण ओव्हर फ्लो ; पण पर्यटकांना वर्षाविहार करण्यास मनाई
- पावसाने केला ‘गेम’; भारतीय संघ अजूनही करू शकतो ‘प्लेइंग ११’ मध्ये बदल ! घ्या जाणून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
