रायपूर : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. अशातच, कडक निर्बंध, टाळेबंदी, व्यवसायांमधील मंदी यामुळे लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि अशातच पाल्यांच्या शाळांकडून फी ची मागणी याने आर्थिक विवंचनेत भर पडली आहे.
शाळांनी कोरोना काळातील वाढीव फी माफ करावी. तसेच, प्रत्यक्षात शाळा सुरु नसल्याने फी कमी करावी अथवा ती आकारण्यात येऊ नये अशी मागणी गेल्या वर्षभरात केली जात आहे. हा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. अशातच छत्तीसगडमधील खासगी शाळांनी स्तुत्य निर्णय घेतला आहे.
छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटने ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं कोरोनामुळे निधन झालं आहे अशा विद्यार्थ्यांची फी न घेण्याच निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकडून स्कूल बस, गणवेशाची फी याचा देखील समावेश असेल. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. हे लक्षात ठेऊन निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण येऊ नये यासाठी या संघटनेनं मुख्यमंत्री बाघेल यांच्याकडे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं कोरोनानं निधन झालंय, अशा विद्यार्थ्यांचा समावेश आरटीईमध्ये करण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला आहे. छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटचे अध्यक्ष राजीव गुप्ता यांनी राज्य सरकारचा निर्णय येईपर्यंत अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवलं जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना आ. प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड
- काँग्रेस आ.प्रणिती शिदेंच्या बैठकीला प्रचंड गर्दी, आमदारासह माजी खासदारांवर गुन्हा
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
- स्पुटनिक व्ही लस मुंबई-पुण्यात कधी मिळणार ? डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजने दिली माहिती !


