मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याने विविध लस भारतात आयात करण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ खेपा भारतात दाखल झाली आहे. परदेशात निर्मित झालेली व भारतात आयात केलेली ही पहिलीच लस ठरली आहे.
या लसीबाबत भारतीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रशियाची स्पुतनिक व्ही ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. शिवाय या लसीचा कोणताही साईड इफेक्ट नसल्याच्या दावा कंपनीने केला आहे. अपोलो हॉस्पिटल आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी या लसीचे एकत्रितपणे लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
ही लस महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमध्ये कधी दाखल होणार याकडं अनेकांचं लक्ष लागलं असून आता डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजने याबाबत माहिती दिली आहे. तूर्तास तरी स्पुतनिक व्ही ही लस प्रायोगिक तत्वावर हैदराबाद आणि विशाखापट्टणम इथेच सुरु केली आहे. त्यानंतर ही लसीकरण मोहीम दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे इथे सुरु करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
स्पुटनिक व्ही लसीची किंमत किती ?
भारतात या लसीच्या एका डोसची किंमत ९४८ रुपये इतकी ठरवण्यात आली असून त्यात अधिक ५ टक्के जीएसटी देखील द्यावा लागणार आहे. म्हणजेच या डोसच्या एका लसीसाठी एकूण ९९५ रुपये मोजावे लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना आ. प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड
- काँग्रेस आ.प्रणिती शिदेंच्या बैठकीला प्रचंड गर्दी, आमदारासह माजी खासदारांवर गुन्हा
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
- मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार-प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

