🕒 1 min read
जळगाव : तीन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या विविध संघटनांचा स्वतंत्र तीन ते चार तास अजिंठा विश्रामगृहात आढावा घेतला होता. या बैठकीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले. यामुळे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह जवळपास २५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
प्रणिती शिंदे यांनी दि. १५ मे रोजी जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहावर दुपारी एक ते सायंकाळी पाच या कालावधीत पक्षाचे पदाधिकारी व महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठक घेण्यापूर्वी पक्षाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचा अभाव होता, तर काही जण विना मास्क होते. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास ही कृती कारणीभूत ठरली. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या सर्वच नियमांचे उल्लंघन या बैठकीत करण्यात आले होते.
याची दखल घेत रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी अध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे इत्यादींवर गुन्हा दाखल झाला आहे.
बैठकीला प्रचंड गर्दी
१५ मे रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास अजिंठा विश्रामगृहात प्रचंड गर्दी उसळली होती. एकीकडे प्रशासनाकडून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना गर्दी टाळण्याच्या सूचना असताना काँग्रेसच्या या आढावा बैठकीमुळे अजिंठा विश्रामगृहाला यात्रेचे स्वरूप आले होते. आत सभागृहात पाय ठेवायला जागा नव्हती. ‘या प्रचंड गर्दीत तुम्ही जसे सोशल डिस्टन्सिंग पाळतात, तसेच आम्ही पाळतो’, असे उत्तर गर्दीच्या प्रश्नावर आमदार शिंदे यांनी दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
- मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार-प्रकाश आंबेडकर
- कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा – आशिष शेलार
- जयंत पाटलांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाला लावले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
