Share

राज्यभरात मराठा आंदोलक अक्रमक; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात निदर्शनं

Published On: 

पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. औरंगाबादेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन होणार आहे.

जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.

औरंगाबादमध्ये आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मराठा मोर्चाचे काही कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं. यावेळी आक्रमक आंदोलकांनी पालकमंत्री सुभाष देसाईंना निवेदनही दिले.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!