🕒 1 min read
वर्धा : लोकसभेचे अधिवेशन प्रारंभ झाल्यानंतर वर्धा लोकसभा कोविड-19 च्या प्रादुर्भावाअंतर्गत केन्द्रशासनाने शेतकर्यांना कोणती विशेष मदत उपलब्ध करुन दिली याबाबत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देतांना केन्द्रीय कृषी मंत्री नरेन्द्र सिंग तोमर जी यांनी कृषि अवसंरनचा कोष अंतर्गत केन्द्रीय क्षेत वित्त पोषण सुविधेला योजना दिनाकं ८ ला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये व्याज सुट आणि आर्थीक मदत देण्यात येत आहे. शेतकरी पिक कर्जाच्या अंतर्गत शेतकर्यांना कर्ज यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी ८४६0 करोड रुपये अस्थायी स्वरुपात देण्यात आलेले आहे. शेतकर्यांना सवलतीच्या प्रोत्साहन कर्ज योजने अंतर्गत ३ सप्टेबंर २0२0 पर्यंत १२३.५१ केसीसी कार्ड आणि १0६,१९१ करोड रुपये मंजुर करण्यात आले आहे.
शेतक-यांसाठी आपत्कालीन कार्यकारी भांडवल ३0000 करोड रुपयाची अतिरीक्त मंजूर करण्यात आली आहे, हा निधी नाबार्डच्या माध्यमातुन सहकारी बॅक आणि क्षेत्रीण ग्रामीण बॅंक व्दारा शेतीकर्जाकरिता छोटे व मध्यम शेतकर्यांला लाभ होईल, मासेमारी करिता सहाय्यता करिता प्रधानमंत्री मत्स्य सम्पदा योजना अंतर्गत मत्सपालन के लिये ११000 करोड व मुलभूत रचना (मत्स्य पकडण्याकरिता बंदरगाह, शीट र्शृखंला, बाजार) च्या विकासाकरिता ९000 करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच पशुपालक व दुग्ध विकास करणार्या घटकाकरिता डेयरी प्रस्करण, मूल्य संवर्धन आणि पशु चारा पायाभूत सुविधा वाढविण्याकरिता पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास स्थापन करुन याकरिता १५000 करोड रुपये निधी मंजुर करण्यात आलेला आहे, केन्द्रसरकारने कोरोना परिस्थीती लक्षात घेऊन शेतक-यांना अभुतपूर्व अशी मदत केली असल्याचे उत्तर केन्द्रीय कृषी मंत्री नरेन्द्र सिंग तोमर जी यांनी खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले.
शेतकर्यांच्या हितार्थ कुठल्याही परिस्थीतीत अन्याय होणार नाही हा माझा प्रयत्न आहे तसेच केन्द्रशासनाच्या माध्यमातुन सवोर्तोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकसभेच्या माध्यमातुन जास्तीत सामान्य नागरिकांचे व शेतकर्यांचे लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- कांद्याची निर्यात बंदी मागे घ्या, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल!
- कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर शरद पवार हेच मार्ग काढतील- आशुतोष काळे
- माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींनी बाळासाहेब ठाकरे मालमत्ता कर माफी योजनेचा लाभ घ्यावा- संग्राम जगताप
- राज्यभरात मराठा आंदोलक अक्रमक; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात निदर्शनं
- नागपुरात कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
