🕒 1 min read
मुंबई : गुढीपाडव्यादिवशी झालेल्या सभेनंतर उत्तर सभेतही राज ठाकरे यांनी लाउडस्पीकर संदर्भात ३ मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वावरून मनसेवर निशाणा साधला होता. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे.
बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेंच काय सुरु होतं? असे सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले होते. आता या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलाच टोला लगावला आहे. म्हणाले, “मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेतील असरानी यांच्याप्रमाणे झाली आहे. अर्ध्यांनी मनसेवर तुटून पडा, अर्ध्यांनी भाजपवर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो”.
“राज ठाकरे यांनी केवळ कायदा पाळा असं सांगितलंय. सरकारनंही त्याचं पालन केलं पाहिजे. आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे कायदा पाळत नाहीयेत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक आणि हिंमत सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकारनं दाखवली पाहिजे,” असं एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. तसेच “आम्ही गुढीपाडव्याच्या सभेपूर्वी ती सभा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या सभेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. आजचीही सभा ऐतिहासिक असेल. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ते कोणते मुद्दे मांडणार याची उत्सुकता सर्वांना आहे,” असंही देशपांडे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
