🕒 1 min read
मुंबई : आज (१ मे ) महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून राज ठाकरेंची आजची सभा ऐतिहासिक होईल, असा विश्वास मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संदीप देशपांडे म्हणाले की,‘जशी गुढीपाडव्याची सभा झाली आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं. मला असं वाटतं त्याचा पुढचा टप्पा हा संभाजीनगर आहे आणि या संभाजीनगरमधून एक ऐतिहासिक मॅसेज नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभर जाणार आहे’, असे देशपांडे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र स्थापनेस ६२ वर्षे झाली तरी मुंबई कुणाची?”, संजय राऊत यांचा सवाल
- “…हा महाराष्ट्राचाच अपमान”, पंतप्रधान मोदींवर संजय राऊत यांची टीका
- “महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
- राज ठाकरेंच्या सभेवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- “अशा सुपारी सभा महाराष्ट्राने…”, राज ठाकरेंच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
