मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच एका बाजूला आपण महाराष्ट्र दिन साजरा करायचा व त्याचवेळी महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत हालचालींना वेग यावा, हे बरे नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘इतक्या वर्षांनंतरही मुंबई कोणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे. पण आधी ती महाराष्ट्राची आहे म्हणून हिंदुस्थानची आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थाने आजही पूर्णपणे संपलेली नाहीत. आधी मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे व एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळ्याची पूर्ण कल्पना आहे’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘फडणवीस यांनी मुंबईत जे अमराठी पंचक निर्माण केले आहे, त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी करता येईल याचे एक ‘प्रेझेंटेशन’ तयार करून गृह मंत्रालयास सादर केले. ‘विक्रांत’ घोटाळय़ातील आरोपी व त्यांच्या अमराठी बिल्डर साथीदारांकडे त्या मोहिमेची सूत्रे आहेत. एका बाजूला आपण महाराष्ट्र दिन साजरा करायचा व त्याच वेळी महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत हालचालींना वेग यावा, हे बरे नाही.’
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र स्थापनेस ६२ वर्षे झाली तरी मुंबई कुणाची?”, संजय राऊत यांचा सवाल
- “…हा महाराष्ट्राचाच अपमान”, पंतप्रधान मोदींवर संजय राऊत यांची टीका
- IPL 2022 : मोठी बातमी..! महेंद्रसिंह धोनी पुन्हा बनला CSKचा कर्णधार; वाचा सविस्तर!
- IPL 2022 RR vs MI : राजस्थानचं मुंबई इंडियन्सला १५९ धावांचं आव्हान; बटलरचं अर्धशतक!
- IPL 2022 RR vs MI : हुश्श..जिंकलो! रोहितला मिळालं बर्थडे गिफ्ट; मुंबई इंडियन्सचा पहिला विजय!


