पुणे : राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होता असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते मेहबूब शेख यांचे नाव देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याने राज्यातील महिला सत्ताधारी नेत्यांपासून सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या ११ दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापलेले आहे. राठोड गेल्या काही दिवसांपासून गायब असून त्यांचा फोनही लागत नाही. मातोश्रीवरून तसे आदेशच आहेत.आज मंत्री गायब असले तरीही वन मंत्रालयाचे कामकाज सुरू असल्याची बातमी आली होती.
दरम्यान, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. रोज तुमच्या सोबत बसणारा सहकारी मंत्री ११ दिवस गायब आहे त्याला तरी शोधा, महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ना आता ना पता. जनतेला वाऱ्यावर सोडल हे दिसतय पण किमान सहकारी मंत्री त्याचा तरी शोध घ्या असा टोला केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.
महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होत पण आता मंत्री महोदय १० दिवस गायब असतात कुणालाच सापडत नाही यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते? @OfficeofUT @AnilDeshmukhNCP अहो रोज तुमच्या सोबत बसणारा सहकारी मंत्री ११ दिवस गायब आहे त्याला तरी शोधा
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 18, 2021
दरम्यान, संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. संजय राठोड गुरुवारी समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य येईल, असंही अजित पवार म्हणालेत.
वस्तुस्थिती पाहिली तर उपाध्ये यांनी केलेल्या टीकेत कुठेही अतिशयोक्ती नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील वनमंत्री अश्या पद्धतीने गायब होणे हे आश्चर्यकारक आहे. एवढे दिवस उलटून गेल्यावर देखील कोणतीही माहिती समोर येत नसल्याने चव्हाण कुटुंबियांची देखील बदनामी होत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, जर राठोड मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे पवार सांगत आहेत तर मग ते जनतेच्या आणि माध्यमांच्या समोर का येत नाहीत असा बेसिक प्रश्न उपस्थित होत आहे. ते कोण लोकं आहेत ज्यांच्या राठोड संपर्कात आहेत हे सुद्धा पुढे यायला हवे कारण राजकीय नेत्याचा सहभाग असल्याने हे प्रकरण दडपून टाकले जाईल अशी सुद्धा चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबातील निकालांमुळे भाजपला धक्का; अमित शहांनी घेतली तातडीची बैठक
- भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवणार : आ. आंबादास दानवे
- ‘मौत का कुआँ’ बनलेल्या ‘त्या’ विहिरीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचेही काम सुरू
- शुद्धीवर न आलेल्या महिलेची आखेर ओळख पटली; गुढ मात्र कायम
- ‘चिनीसैन्य माघार घेत असल्याचा उत्सव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेची बनवाबनवीच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

