मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तर मराठा समाज आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असून समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल असा इशारा मराठा नेते देत आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या भेटीसाठी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मराठा आरक्षणासह सर्वच विषय गांभीर्याने ऐकले असून ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. या भेटीवर मराठा आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे.
विनोद पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट फक्त मराठा आरक्षणासाठी आहे असं काल पासून राज्यात चित्र रंगवलं गेलं. मात्र अस काही घडलं नाही आम्हाला फक्त आशा दाखवण्यात आली आम्हाला वाटलं आज जबाबदारी निश्चित होईल, केंद्र किंवा राज्य सरकारबाबत मात्र असं काहीच झालं नाही साधं आश्वासन सुद्धा मिळालं नाही, हे दुर्दैवी आहे, आरक्षण मुद्दा अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता मात्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्यसरकारने करून घेऊ नये हे आम्ही स्पष्ट सांगतोय.’
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाची दिशाभुल करणारी राजकीय भेट, मोदी-ठाकरे भेटीवर विनायक मेटे यांची टीका
- नवरदेव पाहिजे पण कोव्हिशिल्ड लस घेतलेलाच…,वधू पक्षाची अनोखी मागणी
- मोदी-ठाकरेंचे ‘एकांतातील’ ते ३० मिनिटं पुन्हा युतीची नांदी ठरणार ?
- ‘दिल्लीत ‘ढकललं केंद्रावर’ चा प्रयोग, नापास विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडे’
- सत्तेत एकत्र नाहीत याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही – उद्धव ठाकरे


