दिल्ली : मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या भेटीसाठी उपस्थित होते.
दरम्यान, जवळपास ४५ मिनिटे ही भेटीसाठी निर्धारीत करण्यात आली होती. परंतु, जवळपास पावणे दोन तास ही बैठक सुरू होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अशोक चव्हाण, अजित पवार यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं. या भेटीनंतर ठाकरे व मोदी यांची वैयक्तिक वेगळी भेट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पत्रकार परिषदेमध्ये खुद्द उद्धव ठाकरेंनी या भेटीची कबुली दिली आहे.
‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिकरित्या ३० मिनिटे भेट घेतली. सत्तेत एकत्र नाहीत याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. या भेटीत वावगं काहीच नाही. मी काही नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो,’ असा टोला लगावतानाच आजची भेट ही अधिकृत असल्याची देखील त्यांनी आवर्जून नोंदवलं.
दरम्यान, या ३० मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं याबाबत त्यांनी खुलासा केला नसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून नरेंद्र मोदी यांची ठाकरे घराण्याशी असलेली मैत्री ही वेळोवेळी देशाने पाहिली आहे. या भेटीमुळे आता दोन भाऊ एकत्र येऊन पुन्हा युती होणार का ? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ १२ जागांचा वाद पुन्हा पेटणार, ठाकरे सरकारने केली पंतप्रधानांकडे राज्यपालांची तक्रार
- ‘मोदींमुळे ‘त्या’ एकरकमी चेकचे ७ हजार कोटी वाचले; आता ठाकरेंनी गरजूंसाठी आर्थिक पॅकेज द्यावे’
- संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न
- ‘दिल्लीत ‘ढकललं केंद्रावर’ चा प्रयोग, नापास विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडे’
- नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र न्यायालयाने केलं रद्द


