Share

नवरदेव पाहिजे पण कोव्हिशिल्ड लस घेतलेलाच…,वधू पक्षाची अनोखी मागणी

Published On: 

मुंबई : लग्नाच्या जाहिराती अनेकदा आपण पाहतो यात वधू आणि वर यांच्या वेगवेगळ्या मागण्या दिलेल्या असतात. उदा. सुशिक्षित, गोरा, नोकरदार, समजूतदार, घरदार असणारा मुलगा मुलीला हवा असतो. मात्र यावेळी मात्र एका मुलीने वेगळीच मागणी केली आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला हसू येईल. ते म्हणजे वधू पक्षाला तिनं जी लस घेतलेली आहे तीच लस घेतलेला तिला नवरा मुलगा हवा आहे.

नवरा मुलगा हवाय पण कोविशिल्डचेच डोस घेतलेला, लग्नाच्या जाहिरातीवरही लसीकरणाचा इफेक्ट | Effect of vaccination on marriage advertisement Groom wanted but took the dose of Covishield ...

एका इंग्रजी वर्तमान पत्रात ४ जून रोजी ही जाहिरात प्रकाशित केली गेली आहे. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही जाहिरात वधूपक्षानं दिलेली आहे. त्यात असे लिहिले की, रोमन कॅथोलिक मुलगी आहे, तिची 24/5’4″ वय- उंची आहे. तिनं गणितात M.Sc केलेलं आहे. सेल्फ एम्पलॉईड आहे. कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

वराची अपेक्षा अशी आहे, रोमन कॅथोलिक असावा, त्याचं वय २८ ते ३० वर्ष हवं. पदवीधर, स्वतंत्रवृत्तीचा, कुणावर अवलंबुन नसलेला, धैर्यवान, विनोदी, पुस्तकं वाचणारा असा असावा. त्यानं कोविशिल्डचा दोन्ही डोस घेतलेला असावा. या आगळ्या वेगळ्या मागणी मुळे या जाहिरातीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!