Share

‘दिल्लीत ‘ढकललं केंद्रावर’ चा प्रयोग, नापास विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडे’

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. जवळपास दीड तास ही बैठक सुरू होती.

मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे यांची मोदींशी ही दिल्लीतील पहिलीच भेट होती. मात्र, या भेटीनंतर आता भाजपने महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आता ट्वीट करून महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ‘दिल्लीत ‘ढकललं केंद्रावर’ चा प्रयोग. नापास विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना साकडे, आम्हाला झेपत नाही हो, तुम्ही तरी करा.’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी या भेटीनंतर केले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व बांधकाममंत्री अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते. दरम्यान आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपने तातडीची बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यात भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं तरी दिल्लीतील ठाकरे-मोदी भेटीच्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!