🕒 1 min read
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. राज्य सरकारने पंचनामे न करता तातडीने मदत जाहीर करावी. मी केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात पाठवीत असून केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना आता मदत देणे आवश्यक आहे.
अतिवृष्टी व पूरग्रस्त परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने प्रति हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत करावी, तसेच बँकांचे कर्ज हप्ते थांबवावेत, विमा कंपनीने उसाचा देखील विमा द्यावा अशी मागणी त्यांच्यासमोर नुकसानग्रस्तांनी केली. मागील आठवड्यामध्ये पावसाने मोठा हाहाकार केला. खरीप पिके कापूस, सोयाबीन, मका, पपई आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. तालुक्यातील खारी नदी मनुर, शिवना, ढेकू नदी वर असलेले किमान सात ते आठ पाझर तलाव पावसाच्या पाण्याने वाहून गेले.
यामुळे वस्ती, गावे आणि शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. संपूर्ण वैजापूर आणि कन्नड तालुक्यामध्ये किमान सात ते आठ केटीवेअर आणि तलाव वाहून गेले आहेत. या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मोटारसायकल आणि बैलगाडी वर जाऊन झालेल्या शेतीचे प्रचंड नुकसानीती प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानीच्या आढावा घेताना मदतीची प्रचंड मागणी आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी यासंदर्भात मी भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन यावेळी डॉ. भागवत कराड यांनी दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, डॉ. दिनेश परदेशी, संजय खंबायते आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मॉन्सून परतीचे संकेत; ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता
- राज्यातील जि.प. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दबदबा, पाहा कोणाच्या पारड्यात किती जागा
- देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत वंचितची एन्ट्री; आंबेडकरांकडून विश्वासू सहकाऱ्याला तिकीट
- सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने उस्मानाबादला ओला दुष्काळ जाहीर करा- राणा पाटील
- धोनी शार्दुलचा टी20 वर्ल्डकप संघात समावेश करण्याच्या सूचना कोहलीकडे करणार : मायकल वॉन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
