Share

सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने उस्मानाबादला ओला दुष्काळ जाहीर करा- राणा पाटील

Published On: 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून जिल्हावासीयांना सर्व अनुषंगिक व आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महसूल विभागाच्या कार्यप्रणालीनुसार ३० सप्टेंबरला हंगामी पैसेवारी जाहीर केली जाते. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ७३७ गावांमध्ये ही पैसेवारी ५० पैशांच्या आत केलेली आहे. खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात पावसामुळे पडलेला खंड आणि काढणीच्या काळात झालेली अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे व शेतीचे अभूतपूर्व नुकसान झालेले आहे. काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली नाही, म्हणून पंचनामे केले जात नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. जेथे नुकसान झाले आहे, तेथे पंचनामे करणे अभिप्रेत आहे. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महसूल आणि कृषी यंत्रणा सर्वत्र फिरलेली आहे.

नुकसानीची व्याप्ती त्यांना माहीत असल्याने अंतिम पैसेवारीची वाट न पाहता जिल्ह्यात राज्य शासनाने सरसकट अनुदान देणे नैतिकतेने बंधनकारक आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल.असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!