नवी दिल्ली : दुबईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलची रंगत आता वाढताना दिसत आहे. सर्वच संघ विजेतेपत पटकवण्याच्या हेतूने मैदानावर उतरत आहेत. टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेले काही खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. आयपीएल नंतर लगेचच भारतीय संघाला टी20 वर्ल्ड कपसाठी खेळायचे आहे.
सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेले खेळाडू इशान किशन, सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती हे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहेत. तर शार्दुल ठाकूर, दीपक चहर, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल यांचा अंतिम 15 जणांमध्ये समावेश नाही. बीसीसीआयला या टीममध्ये बदल करण्याची संधी 10 ऑक्टोबरपर्यंत आहे. मात्र, बीसीसीआयनं संघ बदली बाबत अजून कोणतेही संकेत दिले नाहीत.
दरम्यान, टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघात बदल करावे अशी मागणी क्रिकेटप्रेमी आणि दिग्गजांनकडून करण्यात येत आहे. यातच हातात इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन याने चेन्नई सुपर किंग्सचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा टीममध्ये समावेश करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
वॉननं ‘क्रिकबझ’ शी बोलताना म्हणाला, ‘टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी शार्दुलचा समावेश करण्याची सूचना कॅप्टन विराट कोहली आणि हेड कोच रवी शास्त्री यांच्याकडे करणार असं तो म्हणाला आहे. शार्दुल ठाकूरनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर वॉननं हे मत व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
