🕒 1 min read
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साबणे हे यापुर्वी शिवसेनेकडून तीनवेळा निवडून आले होते. 2019 मध्ये ते या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर यांच्याकडून पराभूत झाले होते. अंतापूरकर यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली आहे. येत्या 30 ऑक्टोबरला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.
नांदेडमधील देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. डॉ. उत्तम रामराव इंगोले यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने देगलुरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. आता इथे तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने शिवसेनेतून आलेले सुभाष साबणे यांना रिंगणात उतरवलं आहे.
वंचित बहुजन आघाडीने पत्रक प्रसिद्ध करुन आपला उमेदवार घोषित केला. देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घोषित करत आहोत. डॉ. उत्तम रामराव इंगोले यांना उमेदवारी देत आहोत, असं वंचित आघाडीने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
