Share

मॉन्सून परतीचे संकेत; ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

पुणे:  देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. माॅन्सनने यंदा १३ जुलै रोजी राजस्थासह संपूर्ण भारत व्यापला होता. राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत.  बिकानेर, जाेधपूर, जालाेर आणि भूजपर्यंतच्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे.

पुढील ३ ते ४ दिवसात राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागातून मॉन्सून माघारी परतण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजराजमध्ये पावसाने उघडीप दिली आहे.

दरम्यान, आज ६ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे तर ७ ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सध्या पुढील आणखी चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!