जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची राज्यशासनावर जोरदार टीका केली आहे . महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास कारणीभूत ठरणारा वेदांत प्रकल्प हा गुजरातकडे वळविण्यात आला असून हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. तसेच राज्यासाठी मोठी दुर्देवी बाब आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे राज्याची जी आर्थिक उलाढाल आहे, त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली असती, राज्याचा जीडीपी दर वाढला असता. प्रत्यक्ष उत्पन्न वाढल असत, लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता, मात्र हा प्रकल्प गुजरातकडे वळविल्याने या सर्वांपासून महाराष्ट्र वंचित राहणाार आहे. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना हा प्रकल्प गुजरातकडे वळविला यात मोठे राजकारण आहे, असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ! भोसरी भुखंड घोटाळा प्रकरणी अँन्टी करप्शन कोर्टात होणार सुनावणी
- Ajit Pawar | “कधीतरी मेंदू म्हणेल, अरे झाेप… झोप…!” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना टोमणे
- Sanjay Gaikwad । बाळासाहेबांची परंपरा तर आम्ही जोपासत आहोत, त्यामुळे मेळावा घेणारच; संजय गायकवाड आक्रमक
- Eknath Shinde | नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र
- Mobile Side Effects | सावधान! मोबाईलमुळे तुमच्या मुलांना होऊ शकतात ‘हे’ धोकादायक आजार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

