पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी मोठा झटका दिला होता. खडसे यांच्यावर आरोप असलेल्या भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी पुणे लाचलुचपत विभागानं घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात तपास करण्याच्या मागणीसाठी अर्ज सादर करण्यात आला होता. अशातच आता पुन्हा खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढः
1 ऑक्टोबर रोजी भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी अँन्टी करप्शन कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रकरण एसी कोर्टात चालवायचं की पीएम एल ए कोर्टात चालवलं जावं या संदर्भात स्पष्टता होणार आहे. एसी कोर्टानं जिल्हा न्यायाधीशांकडे विचारणा केली. प्रकरण कोणत्या कोर्टात चालवलं जावं ? यावर लवकरच निर्णय होईल. अंजली दमानियांच्या वकिलांनी हे प्रकरण एसी कोर्टात चालवलं जाऊ शकतं असं म्हटलं आहे. मात्र, न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य आहे असंही वकिल असीम सरोदे यांनी कोर्टात सांगितलं. आजच्या सुनावणीत कोर्टानं 1 तारीख दिली आहे.
खडसेंची प्रतिक्रीयाः
भोसरी प्रकरणाबाबत अनेकदा चौकशी झाली असून झोटिंग समितीनेही चौकशी केली असल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं होतं. तसेच पुण्याच्या अँटी करप्शन विभागानं चौकशी करुन या प्रकरणात तथ्य नाही. हे प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिलाय. मी 40 वर्षाच्या राजकीय जीवनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. चुकीचं काम केलेलं नाही. भोसरी प्रकरणाची चौकशी कोणत्याही यंत्रणेने केली तरी काहीही तथ्य निघणार नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “कधीतरी मेंदू म्हणेल, अरे झाेप… झोप…!” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना टोमणे
- Sanjay Gaikwad । बाळासाहेबांची परंपरा तर आम्ही जोपासत आहोत, त्यामुळे मेळावा घेणारच; संजय गायकवाड आक्रमक
- Eknath Shinde | नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र
- Mobile Side Effects | सावधान! मोबाईलमुळे तुमच्या मुलांना होऊ शकतात ‘हे’ धोकादायक आजार
- व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना धक्का! पुढील महिन्यापासून “या” स्मार्टफोन्समध्ये काम करणार नाही ॲप, जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

