🕒 1 min read
जळगाव : देशात महागाईचा आगडोंबळ उसळला असतांना बेरोजगारीचाही प्रश्न जटील झाला आहे. अशा स्थितीत ३ लाख तरुणांना रोजगाराची संधी असणारा ‘वेदांता’ सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे योग्य नाही. या संदर्भात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, रोहीत पवार, सुभाष तोटे यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा. यासाठी मुख्यंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार पाचोरा येथे म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सकाळी ६ वाजता झोपण्याच्या वक्तव्यावरुन देखील टोमणे लगावले.
अजित पवार म्हणाले, मविआचे सरकार असतांना वेदांता प्रकल्प राज्यात व्हावा. यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. सवलतींही दिल्या होत्या. तळेगाव येथे एक हजार जागा देखील निश्चित झाली होती. मात्र हा प्रकल्प इतर राज्यात गेला आहे. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांचे केंद्रात चांगले संबंध आहेत. त्यांनी त्याचा वापर करावा.
अजित पवार यांचे एकनाथ शिंदेंना टोमणे –
मुख्यमंत्र्यांच्या सकाळी ६ वाजता झोपण्याच्या वक्तव्यावरुन अजित पावर यांनी चांगलेच टोमणे लगावले. “एकनाथ शिंदे म्हणाले मी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो, मग हे झोपतात कधी? २४ तास माणूस एक-दोन दिवस काम करु शकेल. किंवा सुरतला गेल्यावर आता पद मिळणार म्हणून जागू शकेल. पण कधीतरी मेंदू म्हणेल, अरे झाेप…झोप. सहा तास तरी झोप पाहीजे. आम्ही ५५ वर्ष शरद पवारांच काम पाहील आहे. ते रात्री दोन वाजता जरी झोपले तरी सकाळी ७ ला तयार असायेच. पण ते देखील ५ ते ६ तास झोप घ्यायचे. पटेल असं बोलावं राव लय पुढचं बोलायला लागलाय. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, आम्हाला आदार आहे. पण तुम्ही न पटण्यासारखे बोलायला लागल्यावर आम्हालाही बोलायला लागणार”, असे अजित पवार म्हणाले.
गद्दार म्हटले की यांचे (शिंदे गट) धाबे दणाणतात-
“गद्दार म्हटले की यांचे (शिंदे गट) धाबे दणाणतात. तुम्ही गद्दार नाही तर तुम्हाला का लागतं. ज्यांनी कोणी गद्दारी केली असेल त्यालाच लागेल. आम्ही कुणाचे नाव घेतले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी चालणार नाही,” असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितेल.
तुम्ही गाजर दाखवण्याचे धंदे करताय काय?-
“वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन हा प्रकल्पाला तळेगावला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिली. यातून दिड लाख रोजगार मिळणार होता. मात्र हा प्रकल्प ज्या ठीकाणी गेला तो दबावातून गेल्याचे समजते. यावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत, का आवाज उठवत नाहीत. आता म्हणतात हा प्रकल्प गेला तर गेला दुसरा मोठा प्रकल्प आणू, मोठा प्रकल्प आणाचं पण हा का जाऊ देत आहात. तुम्ही गाजर दाखवण्याचे धंदे करताय काय?”, असा खोचक सवाल देखील अजित पवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र
- Mobile Side Effects | सावधान! मोबाईलमुळे तुमच्या मुलांना होऊ शकतात ‘हे’ धोकादायक आजार
- व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना धक्का! पुढील महिन्यापासून “या” स्मार्टफोन्समध्ये काम करणार नाही ॲप, जाणून घ्या..
- Sandeep Deshpande| “…तेव्हा मित्रालाच काय, राज साहेबांनी भावालाही सोडलं नाही”
- Eknath Khadse | “अजूनही वेळ गेलेली नाही, राज्यसरकारने प्रतिष्ठा पणाला लावून…” एकनाथ खडसेंचा राज्यसरकारला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
