Share

राज्य सरकारने लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला; वडेट्टीवार यांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तसेच ज्यांनी लस घेवून १५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी एक ऍप देखील असणार आहे त्यावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देखील हा पास मिळणार आहे.

दरम्यान, यावरूनच लोकलचा निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले होते. प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना त्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती तसेच जनतेची सुविधा लक्षात घेतली पाहिजे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करु द्यायचा होता तर मग हा निर्णय फार आधी घ्यायला हवा होता असंही दानवे यांनी म्हटलं होतं.

आता राज्य सरकारने लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड आता काय निर्णय घेणार हे मुंबईकरांसाठी महत्वाचं आहे. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारने लोकल सुरु करण्याबाबत रेल्वेला प्रस्ताव पाठवल्यास तो मान्य करून आम्ही त्वरित जनतेच्या सेवेत लोकल आणू असं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!