गेवराई – कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेल्या गेवराई, किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांना पोलीसांनी बेदम मारले. बीड दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज या शेतकरी बांधवाची भेट घेतली.
त्यांच्यावर झालेला अन्याय मंत्रालयापर्यंत पोहचवू, अशी ग्वाही दिली. तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी आम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करु असेही आश्वस्त केले.यावेळी सोबत आमदार लक्ष्मण पवार व भाजपा पदाधिकारी होते.
लाॅकडाऊनचे नियम आम्ही पाळतो. सकाळी 11 पर्यंत बी बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस आम्हाला मारतात मग बियाणे आणि खते शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने बांधावर आणून द्यावे. जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका, असा टाहो ठाकरे सरकारच्या नावाने शेतकरी फोडतो आहे असे त्यांनी म्हटले.
मराठा आरक्षणा बाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी भाजपा नेते आमदार आशिष शेलार चार दिवसाच्या बीड आणि नांदेड दौऱ्यावर आहेत. आज बीड येथून या दौऱ्याला सुरुवात झाली.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपाच्या आरक्षणविरोधी कुटील डावाची पोलखोल करणार; लाखे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर
- कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही; शिवसेनेचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- ‘सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून भाजपचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत’
- कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये – सुप्रिया सुळे
- पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरू


