Share

राजकीय गोटात भेटीचं सत्र सुरूच; आज खडसे ‘या’ शिवसेना नेत्यासह पवारांना भेटले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस ते काल जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली.

यावेळी भाजप नेते व आमदार गिरीश महाजन देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या दोन घडामोडींमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असताना आता एकनाथ खडसे यांनी बुधवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली आहे.

खडसे हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर आले होते. यावेळी राज्याचे शिवसेना नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतही उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता या भेटीगाठींना महत्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!