मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस ते काल जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली.
यावेळी भाजप नेते व आमदार गिरीश महाजन देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या दोन घडामोडींमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, फडणवीसांच्या भेटीगाठींवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?’ असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मेकअप टिप्स देणाऱ्या मलायकाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल
- राजकीय गोटात भेटीचं सत्र सुरूच; आज खडसे ‘या’ शिवसेना नेत्यासह पवारांना भेटले
- कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही; शिवसेनेचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- ‘उद्धवजी… जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका’
- दिशा-टायगरला संचारबंदीदरम्यान बाहेर फिरणं पडलं महाग ; मुंबई पोलिसांनी केली कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

