Share

पिकविम्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही, न्यायालयीन लढाईतच यश मिळेल- आ. राणाजगजितसिंह

Published On: 

उस्मानाबाद : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच खरीप २०२० मधील पीक विम्याबाबत राज्य सरकार गंभीर नसून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरु आहे आणि यात नक्कीच यश मिळेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलाय. भाटशिरपुरा येथे श्रीकृष्ण मंदीरासमोरील सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.

माझा मतदारसंघ बदलला तरी गावकऱ्यांशी ऋणानुबंध कायम आहे, मला लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेली खंबीर साथ आयुष्यभर स्मरणात राहील. भाटशिरपुरा ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशन अंतर्गत जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम केले असून यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे व कष्टाचे त्यांनी कौतुक केले. भाटशिरपूरा हे आदर्श गाव करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरात पैसे देणे आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक व कामगारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहे. यामध्ये ‘शेतकरी सन्मान योजने’ चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना, ई-मुद्रा, किसान क्रेडिट कार्ड, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून देण्यात येत असलेले अर्थसहाय्य व सवलती याचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्याची ‘आकांक्षीत’ जिल्हा म्हणून ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा संकल्प आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रेल्वे जंक्शन करण्यासंदर्भात आपण प्रयत्न करत आहोत. त्याच बरोबर कौडगाव एमआयडीसी मध्ये टेक्निकल टेक्स्टाइल पार्क सुरू करणे बाबत आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड यासारखे महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकल्प करणेबाबत राज्य सरकार अकार्यक्षम असले तरी देखील त्याबाबतीत आपण पूर्ण प्रयत्न करत असून हे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!