मुंबई – महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत तब्बल 4 बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. यातील ३ एकट्या पुण्यातील तर आज साकीनाका मुंबई येथे ३४ वर्षीय महिलेवर क्रूर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अभाविप कोंकण प्रदेशने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग द्यावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अभाविपने केली आहे.
दरम्यान,साकीनाका मुंबई येथे ३४ वर्षीय महिलेवर झालेला क्रूर अत्याचार हा अतिशय निंदनीय आहे, ज्या मुंबईला महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित म्हटलं जायचं आज त्याच मुंबई मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडते हे दुर्देवी आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.असे मत अभाविप मुंबई महानगर मंत्री गौतमी अहिरराव यांनी व्यक्त केले
राज्यात महिला अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यसरकार महिला सुरक्षेच्या विषयामध्ये अपयशी ठरले आहे. सध्या राज्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून साकीनाका येथे घडलेली घटना दिल्ली येथील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधून फाशीची शिक्षा देण्यात यावी असे मत कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- गणेश पुजनासाठी गेल्याने ट्रोल झाली अर्शी खान; मात्र व्हिडिओच्या माध्यमाने दिलं तडेतोड उत्तर
- साकीनाका प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा,आरोपीला फाशीच द्या – भाई जगताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

