Share

महाराष्ट्र पुन्हा हादरला! अमरावतीमधील गर्भवती अत्याचार पीडितेची गळफास घेत आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. साकीनाका येथील प्रकरणामुळे राज्यभरात हळहळ होत असताना अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नराधमानं अल्पवयीन मुलीवर बळजबरी केली. यानंतर ती मुलगी गर्भवती राहिली. अखेर ६ महिन्यांची गर्भवती असताना भीतीपोटी पीडितने गळफास घेत आत्महत्या केली आहे. येवदा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडितेच्या आई-वडिलांनी शुक्रवारी येवदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. पीडितेवर गेल्या नऊ महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. येवदा पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. तर, पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.

साकीनाका येथील पीडितेची झुंज अयशस्वी
मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. या महिलेवर ९ सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते.

यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!