🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले आहेत.
चित्रा वाघ यांनी पीडित महिलेची रुग्णालयामध्ये भेट घेतली. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठला आहे. चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारचे वाभाडे काढले आहेत. महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर तोफ डागत महिला आयोगाच्या अध्यक्षपदा बाबत भाष्य केलं आहे.
यशोमती ताई, आम्हाला सांगता राजकारण करु नका तुम्ही, अद्यापही महिला आयोगाला अध्यक्ष नाही देऊ शकला नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षासाठी 8 वेळा फाईल पाठवूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर सही न करता परत पाठवल्या. तुम्ही आमचं नेतृत्व करताय, महिला आयोगाला एक अध्यक्ष देऊ शकत नाही तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचाही अधिकार नाही, असं म्हणत यशोमती ठाकूर यांच्यावर चांगलेच धारेवर धरलं आहे.
शक्ती कायदा आणणार होते त्याचं काय झालं. कुठपर्यंत आला शक्ती कायदा?, असे सवाल करत हे सरकार पहिल्या दिवसापासून बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम करत असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
वुमन अट्रॉसिटी साठी स्पेशल कोर्ट करा. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे याआधी कधीच निघाले नव्हते. महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करता, याचं उत्तर या सरकारला द्यावंच लागेल, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. साकीनाका प्रकरणी चित्रा वाघ यांनी महिला आयोग अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले आहेत.
दरम्यान, पीडित महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. चाकूने हल्ला देखील करण्यात आला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
