औरंगाबाद : गणेशउत्सवाच्या काळात मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे सरकावर टीका होत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांपासून राज्यातील सर्वच मंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते गर्दी न करण्याचे आवाहन करत आहे. असे असले तरी सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्याच कार्यक्रमाला गर्दी होत आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
या संदर्भात सुमीत खांबेकर म्हणाले की, ‘हिरवे लाडू खाणारे सरकार हिंदूवर गुन्हा दाखल करते आणि बलात्कारी महेबूब शेखला वाऱ्यावर साडते आहे. भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांच्याच कार्यक्रमांना गर्दी होत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरात गणपतीची साधी मिरवणूक काढल्यामुळे हिंदूंवर गुन्हे दाखल होत आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील सर्व गणेश भक्तांवरील गुन्ह राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत.’
महेबूब शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. असे असताना राज्य सरकारमधील मंत्र्यांच्याच आशिर्वादाने त्याच्या कार्यक्रमांना गर्दी होत आहे. एकिकडे भाविकांवर गुन्हे दाखल करायचे आणि दुसरीकडे मंत्र्यांच्या आर्शिवादाने पक्षाच्या कार्यक्रमांना गर्दी जमा करायची अशा दुटप्पी भूमीकेवरुन राज्य सरकारवर टीका होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

